चार कॅमेरेवाला अल्काटेल फ्लॅश स्मार्टफोन


कमी किंमतीत मस्त फिचर्सवाले स्मार्टफोन देणार्‍या अल्काटेलने यावेळी अन्य स्मार्टफोन कंपन्यांना मागे सारत चक्क चार कॅमेरे असलेला स्मार्टफोन सादर केला आहे. चार कॅमेरे असलेला जगातला हा पहिलाच हँडसेट असून त्यात दोन कॅमेरे बॅकसाईडला तर दोन फ्रंटला आहेत. यामुळे उत्तम प्रतीचे फोटो, व्हिडीओ तसेच खास सेल्फी काढणे शक्य होणार आहे. २०१५ मध्ये लाँच केलेल्या अल्काटेल फ्लॅश दोनचा हा सिक्वेल फोन अल्काटेक फ्लॅश नावाने सादर केला गेला आहे.

या फोनमध्ये बॅक पॅनलवर १३ एमपीचे दोन कॅमेरे फ्लॅशसह दिले गेले आहेत तर फ्रंट साईडला ८ व ५एमपीचे कॅमेरे फ्लॅशसह आहेत. सेल्फी अधिक चांगल्या प्रकारे काढता याव्यात यासाठी रियल टाईम फेस ब्युटिफिकेशन फिचरही दिले गेले आहे. अन्य फिचरमध्ये ५.५ इंची फुल एचडी आयपीएस डिस्प्ले, ३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी ती मायक्रो कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा,३१०० एमएएचची बॅटरी, अँड्राईड ओएस यांचा समावेश असून हा फोरजी ला सपोर्ट करतो. शिवाय फिंगरप्रिंट, एक्सेलेरेामीटर, प्रॉक्सिमिटी ,एंबिएंटलाईट, डिजिटल कंपास ही दिले गेले आहे. फोनची किंमत अजून जाहीर केली गेलेली नाही.

Leave a Comment