आता श्रद्धांजलीही झाली हायटेक


चीनमध्ये एप्रिलचा पहिला आठवडा किंगमिंग उत्सवाचा असतो. म्हणजे या काळात आपल्या पूर्वजांच्या कबरींना श्रद्धांजली दिली जाते. भूतप्रेत, आत्मा अशा गोष्टींचा पगडा अजूनही असलेल्या चीनमध्ये कबरींवर जाऊन श्रद्धांजली देण्याची प्रथा शेकडो वर्षे सुरू आहे. टोंब स्विपिंग डे नावाने ही प्रथा प्रचलित आहे. म्हणजे आपल्याकडे श्राद्धपक्ष घातली जातात तोच हा प्रकार. या दिवशी चीनी लोक आपल्या पूर्वजांच्या कबरींना भेट देऊन त्या स्वच्छ करतात, फुलांची सजावट करतात व एखादी भेट वस्तू तेथे ठेवतात.


या जुन्या काळच्या प्रथेला आता चीनमध्येही हायटेक तंत्रज्ञानाची जोड दिली गेली आहे. हायटेक श्रद्धांजली असेही त्याला म्हटता येईल. यासाठी तेथील कबरीस्तानांनी खास सुविधा पुरविल्या आहेत. म्हणजे आता पूर्वजांच्या कबरीपर्यंत स्वतः जाण्याची गरज उरलेली नाही तर कबरीस्तानातले कर्मचारीच तुमच्या पूर्वजांची कबर स्वच्छ करून तेथे फुलांची सजावट करतात व व्ही चॅटवर हा सोहळा लाईव्ह बघता येतो. अनेक कबरीस्थानांनी ऑनलाईन मेमोरीयल पेज सुरू केली असून त्यात व्हर्च्युअल मेणबत्ती कबरीवर लावता येते. व्हर्च्यूअल गिफ्टही ठेवता येते.

कांही ठिकाणी तर कबरींना क्यूआर कोड दिले गेले आहेत. फोनवरून स्कॅन करून मेमोरियलचे फोटो घरबसल्या काढता येतात. व्हीडीओ घेता येतात. कांही ठिकाणी कागदाची गॅजेट कबरीवर ठेवता येतात. यात हँडबॅग्ज, घड्याळे, सिडी प्लेअरपासून ते कागदी आयफोन व आयपॅडही कबरीवर समर्पित करता येतात. व्हर्च्युंअल शोकसभाही घेता येते. यामुळे प्रदूषण कमी होते असे सांगिजले जात असले तरी आजही कांही चिनी स्वतः कबरीजवळ जाऊनच आपल्या पूर्वजांबद्दलच्या भावना व्यक्त करणे पसंत करतात.

Leave a Comment