इन्स्टाग्राममुळे होते नैराश्य दूर


इन्स्टाग्राम या फोटो शेअरिंग अॅपने अनेकांना नादाला लावले आहे. त्यामुळे अनेक जण त्याला नाके मुरडतात. परंतु वास्तवात या अॅपचा वापर केल्यामुळे मैत्रीचे बंध घट्ट होतात आणि परिणामी नैराश्य दूर होण्यास मदत होते, असे एका संशोशनातून पुढे आले आहे.

“इन्स्टाग्रामचा सर्वाधिक परिणाम किशोरवयीन मुलामुलींवर होतो. कारण याच वयोगटातील मुलांमध्ये इन्स्टाग्रामची लोकप्रियता वाढत आहे आणि याच वयोगटात नैराश्याची लक्षणे वाढत्या प्रमाणात दिसून येतात,” असे हे संशोधन करणाऱ्या एलिन फ्रिसॉन यांनी सांगितले. बेल्जियममधील युनिव्हर्सिटी ऑफ ल्यूवेन येथे त्या संशोधक आहेत.

येत्या मे महिन्यात अमेरिकेत होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत हे संशोधन मांडण्यात येणार आहे.

फ्रिसॉन या 2013-14 पासून किशोरवयीन मुलांमधील इन्स्टाग्राम अॅपचा वापर आणि त्यांचे सुस्वास्थ्य यांवर अभ्यास करत आहेत.

इन्स्टाग्राम वापरल्यामुळे आपण मित्र-मैत्रिणींच्या जवळ आहोत (मित्र-मैत्रिणी कौतुक करतात) ही भावना निर्माण होते. त्यामुळे नैराश्याचे प्रमाण कमी होते, असे या अभ्यासातून दिसून आले.

मात्र या अॅपमुळे मित्र-मैत्रिणींशी जवळीक निर्माण झाली नाही, तर त्याचे दीर्घकालीन परिणाम हानिकारक होऊ शकतात, असे संशोधकांनी म्हटले आहे.

Leave a Comment