व्हॉट्सअॅपवर येणार निर्बंध ?


नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी घटनापीठाकडे जगातील सर्वाधिक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्स अॅपच्या खासगीत्व धोरणाचा विषय सोपवला असून यावर १८ एप्रिलला घटनापीठ सुनावणी करणार आहे. गोपनीयता आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचा व्यापक मुद्दा या प्रकरणात जोडला गेला असल्याचे न्यायालयाने यावेळी सांगितले. जेव्हा एखादे प्रकरण व्यापक दृष्टीकोनातून सार्वजनिक चिंतेचा विषय बनते, तेव्हा तो विषय घटनात्मक मुद्दा म्हणून समोर येतो, असे सरन्यायाधीश जे.एस. केहर आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या पीठाने सांगितले.

दरम्यान, पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे हे प्रकरण सोपवण्यात आले आहे. शिवाय, सर्व पक्षकारांनी घटनापीठासमोर हजर होऊन सुनावणीसाठी समोर येणारे मुद्दे निश्चित केले पाहिजेत, असे सरन्यायाधीश जे.एस. केहर आणि न्यायमूर्ती डी.वाय.चंद्रचूड यांच्या पीठाने बुधवारी झालेल्या सुनावणीत सांगितले

Leave a Comment