मोशन आय कॅमेरा सिस्टीमचा सोनी एक्सझेड एस स्मार्टफोन लाँच


सोनीने त्यांच्या एक्सपिरीया सिरीजमधील एक्सझेड एस हा नवा स्मार्टफोन भारतात लाँच केला असून हा फोन प्रथम मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०१७ मध्ये सादर केला गेला आहे. ४ एप्रिल ते १० एप्रिल या काळात त्याचे फ्लिपकार्टवर प्रीबुकिंग करता येणार असून ११ एप्रिलपासून त्यांची विक्री सुरू होत आहे.या फोनची किंमत आहे ४९९९० रूपये या फोनसोबत ४९९० रूपयांचे एसआरएस एक्स १३१० वायरलेस ब्लूटूथ स्पीकर व सोनी एलआयव्हीचे ३ महिैन्याचे ३९० रूपयांचे सबस्क्रिप्शन मोफत दिले जाणार आहे.

या फोनमध्ये मोशनआय सिस्टीम दिली गेली असून स्मार्टफोन मध्ये या प्रकारचे तंत्रज्ञान प्रथमच वापरले गेले आहे. १९ एमपीचा रियर कॅमेरा नव्या मोशन आय सिस्टीमसह आहे तसेच सुपर स्लो मोशन व्हिडीओ प्ले बॅक ऑप्शनही दिले गेले आहे. फ्रंट कॅमेरा १३ एमपीचा आहे. अन्य फिचर्समध्ये ५.२ इंची फुल एचडी ट्रील्युमिनियस डिस्प्ले, स्नॅपड्रगन ८२० प्रोसेसर, ४ जीबी रॅम, ग्राफिक्ससाठी अॅड्रीनो ५१० जीपीयू इंटिग्रेटेड आहे. हा फोन ३२ जीबी व ६४ जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये असून दोन्हीची मेमरी मायक्रो कार्डच्या सहाय्याने २५६ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा आहे. हा फोन अँड्राईड ७.० नगेट ओएस सपोर्ट करतो. तसेच तो सिंगल सिम आहे.

Leave a Comment