एअरसेलची मोफत इंटरनेटसाठी ‘गुड नाईट’ ऑफर


नवी दिल्ली – रिलायन्सने आपली जिओ टेलीकॉम सप्टेंबरमध्ये सेवा लाँच केल्यानंतर भारतीय ग्राहकांचा या सेवेला भरभरून प्रतिसाद मिळाला. अनेकांनी जिओची सेवा मोफत फोर जी इंटरनेट, मोफत कॉल्स आणि एसएमएसमुळे स्विकाराली. पण जिओमुळे इतर टेलीकॉम कंपनीचे धाबे चांगलेच दणाणले. देशातल्या मोठ मोठ्या टेलिकॉम कंपनींना जिओमुळे याचा फटका बसला आहे. त्यांचे ग्राहकही कमी झाले आहेत म्हणूनच जिओला टक्कर देण्यासाठी दरदिवशी प्रतिस्पर्धी टेलीकॉम कंपन्या वेगवेगळे प्लॅन आणि ऑफर्स आणत आहेत. आता एअरसेल कंपनीने देखील मोफत इंटरनेट सेवा देणार असल्याचे जाहिर केले आहे.

एअरसेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी गुडनाइट ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना रात्री ३ ते ५ या काळात मोफत इंटरनेट वापरता येणार आहे. दोन महिन्यांसाठी ग्राहकांना ही ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे ३ ते ५ या काळात ग्राहक गाणी, चित्रपट डाऊनलोड करू शकतात. यासाठी इतर कोणत्याही रिचार्जची गरज भासणार नाही. रिलायन्स जिओ प्राईमचे आतापर्यंत ७.२ कोटी ग्राहक झाले आहेत. स्वस्त किंवा मोफत दरात इंटरनेट मिळत असल्याने ग्राहकांची मोठी पसंती जिओला मिळाली. पण जिओमुळे इतर टेलीकॉम कंपन्यांचे मात्र मोठे नुकसान झाले होते. टेलीकॉम क्षेत्रातील अभूतपूर्व यशानंतर आता रिलायन्स जिओ डिटीएच सेवा देखील या महिन्यात लाँच करण्याच्या तयारीत आहे.

Leave a Comment