संगणक प्रोग्रामर, कोडर्सना अमेरिकेचा एचवन बी व्हिसा नाही


अमेरिकेने सध्याच्या एचवन बी व्हिसा पॉलिसीत बदल करण्याची तयारी सुरू केली आहे व त्याचा पोलिसी मेमोरँडम नुकताच सादर करण्यात आला आहे. त्यानुसार संगणक प्रोग्रामर व कोडींग तज्ञ यांना अमेरिकेचा एचवन बी व्हीसा मिळणे दुरापास्त होणार आहे. संगणक प्रोग्राम तयार करणे हे अतिकौशल्याचे काम नसल्याचे अमेरिकेच्या प्रशासनाचे म्हणणे आहे.

नव्या पॉलिसीमुळे कंपन्यांना एचवन बी व्हीसावर संगणक प्रोग्रामर अथवा संगणक कोडिग करणार्‍यांना पाठवायचे असेल तर त्यांच्यातील विशेष कौशल्याची माहितीही द्यावी लागणार आहे. नवी पॉलिसी तत्काळ प्रभावाने लागू केली गेली आहे. यामुळे कंपन्यांना त्यांच्या वार्षिक लॉटरी प्रोसेसमध्ये बदल करणे भाग पडणार आहे.

Leave a Comment