लग्झरी कार निर्मात्या व्होल्व्होने त्यांची नवी सेदान एस ६० पोलस्टार भारतात १४ एप्रिल रोजी सादर करण्याची तयारी पूर्ण केली असून मिडीया रिपोर्टनुसार या गाडीची किंमत ६० ते ७० लाखादरम्यान असेल. दमदार इंजिन व पॉवर ही गाडीची वैशिष्टे आहेत.
व्होल्व्होची एस ६० भारतात १४ एप्रिलला लाँच
या कारसाठी २.० लिटरचे इंजिन दिले गेले असून ऑल व्हिल टेक्नालॉजीचा वापर त्यात केला गेला आहे. या कारला पोलस्टार ऑप्टिमायझेशन पंपही दिला गेला आहे. ० ते १०० किमीचा वेग ही गाडी ४.७ सेकंदात घेते व तिचा टॉप स्पीड आहे ताशी २५० किमी. कारला सेफ्टी फिचर्स मध्ये एअरबॅग्ज, अँडीब्रेकींग लॉकिंग सिस्टीम, शिवाय सेन्सर आहे. अपघात होण्याच्या स्थितीत कार असेल तर सेन्सर ते जाणून आपोआप ब्रेक लागतो. हा सेन्सर कारचा स्पीड ताशी ५० असेल तेव्हाच काम करतो.