मुंबईच्या बांद्रयातील गल्ल्यात भिंतीवर अवतरलेय बॉलीवूड


मुंबईच्या पॉश समजल्या जाणार्‍या बांद्रा या उपनगरातील कांही गल्यातील भितींवर बॉलीवूड अवतरले आहे. रंजित दहिया यांनी ही किमया केली आहे. दहिया नऊ वर्षांपूर्वी मुंबईत आले ते हरियाणातील सोनपत येथून. त्यांनाही हिंदी चित्रपटांचा खूप शौक आहे. मुंबईतील लोकांनाही बॉलीवूडचे प्रेम आहे. दहिया आले तेव्हा बॉलीवूडची शंभरी साजरी होत होती व त्यातूनच या अनोख्य उपक्रमाची कल्पना दहिया यांना सुचली.

त्यांनी ते रहात असलेल्या बांद्रा उपनगरातील गल्ल्यांमधील मोठमोठ्या भिंतींवर बॉलीवूड सितारे रेखाटण्याचा निर्धार केला व अशा मोठया भिंती असलेल्या घरमालकांना त्यासाठी राजी करण्यात यश मिळविले.२०१२ मध्ये यातून प्रथम सलीम अनारकली मधुबाला त्यांनी चितारली. जेवढ्या भिंती मोठ्या तेवढी चित्रे मोठी असे सूत्र त्यांनी अमलात आणले त्यासाठी दिवसरात्र काम केले व लोकांकडून पैशाचीही अ्रपेक्षा केली नाही. मधुबाला चितारली गेली त्या घराचे मालक म्हणतात, सकाळी सकाळीच अनेक लोक मधुबालेला पाहण्यासाठी येतात. वेडींग शूटही केले जाते तर काही वेळा परदेशी माणसेही येथे भेट देतात.


दहिया यांनी बँडस्टँडवर अमिताभ व राजेश खन्ना यांना चित्रमय केले आहे. ते सांगतात राजेश खन्ना यांचे चित्र काढत होतो तेव्हाच दुर्देवाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांना श्रद्धांजली म्हणून हे चित्र काढले. कारण शेवटी ते बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार आहेत. दहिया त्यांच्या आयुष्याविषयी सांगतात १० वी पर्यंत शिक्षण घेतल्यावर मी गावाकडे गायी म्हशी चरायला न्यायचो. शाळेतच एकदा पुस्तकात सरस्वत चित्र काढले. त्यावेळी रंगारी म्हणूनही काम करायचो व तेव्हाच आपण रंगारी नाही तर कलाकार आहोत याची जाणीव झाली. त्यानंतर त्यांनी फाईन आर्टसंदर्भात माहिती मिळविली. चार वर्षे फाईन आर्टचे शिक्षण घेतले व त्यानंतर चार वर्षे अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझायनिंगचा कोर्स पूर्ण केला.


दहिया यांनी दुकानाची नांवे, पाट्या, हायवे पटींग, सोशल मेसेज पेटींग अशा कामांनी व्यवसायाची सुरवात केली तेव्हा २००८ मध्ये मुंबईतून नोकरीसाठी कॉल आला. येथे त्यांना स्ट्रीट पेंटींगची ओळख झाली. त्यातून घराच्या मोठ्या भिंती बॉलीवूड सितार्‍यांच्या प्रतिमांनी सजविण्याची कल्पना आली. सुरवातीला लोक परवानगी देत नसत आता मात्र तसे होत नाही. लोक ओळखतात व आनंदाने परवानगीही देतात. संपूर्ण मुंबई बॉलीवूडच्या रंगात रंगविण्याची त्यांची इच्छा आहे मात्र त्यासाठी पुरेसे आर्थिक बळ त्यांच्याकडे नाही. राजकपूर, हेलेन, किशोर कुमार यांची चित्रेही त्यांना रेखाटायची आहेत.

Leave a Comment