जिओच्या समर सरप्राइजमध्ये अजून सरप्राइज


मुंबई – रिलायन्स जिओने आणखी एक धमाकेदार ऑफर आणली असून जिओने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी समर सरप्राइज ऑफर आणली आहे. इतर ऑफरप्रमाणे ही ऑफर मोफत नसून यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहेत.

तुम्ही जर ९९९ रुपयांचे रिचार्ज केल्यास १०० जीबी ४जी डेटा तुम्हाला मोफत मिळणार आहे. ९९९ रुपयाचे रिचार्ज जिओ प्राइम मेंबरने केल्यानंतर त्याला ६० दिवसांसाठी मोफत कॉलिंगसह ६० जीबी डेटा मिळणार होता पण समर सरप्राइज ऑफरमध्ये कंपनी ग्राहकांना ३ महिन्यासाठी १०० जीबी ४जी डेटा देणार आहे. यामध्ये दिवसाला कोणात्याही लिमिटशिवाय १०० जीबी डेटा वापरता येणार आहे. सरप्राइज ऑफरनुसार मिळालेला हा डेटा ३० जूनपर्यंत वापरता येणार आहे. त्यानंतरही ३१ ऑगस्टपर्यंत रिचार्ज करायची गरज नाही, कारण १ जुलैपासून ३१ ऑगस्टपर्यंत ६० जीबी ४जी डेटा मिळणार आहे.

Leave a Comment