लेनोवोने भारतात लॉन्च केला ‘मोटो जी ५’


मुंबई : आज भारतात आपला बजेट स्मार्टफोन मोटो जी ५ चीनी स्मार्टफोन कंपनी लेनोवोने लॉन्च केला आहे. याआधी कंपनीनं आपला माटो जी ४ प्लस लॉन्च केला होता. त्याचेच व्हर्जन असलेला ‘मोटो जी ५’ हा स्वस्तातील स्मार्टफोन असल्यामुळे हा स्मार्टफोन रेडमी नोट ४ ला जोरदार टक्कर देणार असे चित्र निर्माण होऊ शकते. भारतात या फोनची किंमत १२,९९९ रुपये असण्याची शक्यता आहे.

या फोनमध्ये ५ इंच फूल एचडी डिस्प्ले, १.४ GHz स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर, २ जीबी आणि ३ जीबी रॅममध्ये उपलब्ध असून १६ जीबी आणि ३२ जीबीचा ऑप्शन इंटरनल मेमरीमध्ये देखील हा फोन उपलब्ध होणार आहे. (मायक्रो एसडी कार्डाच्या साहाय्याने मेमरी १२८ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते). या फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा (फेस डिटेक्शनसाठी ऑटो फोकस सपोर्ट) रिअर आणि ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Leave a Comment