आयडियादेखील देणार ३०० रुपयात २८ जीबी डेटासह अनलिमिटेड कॉलिंग


मुंबई: आयडिया सेल्युलरने रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी नवा प्लान आणला असून आपल्या यूजर्ससाठी कंपनीने ३४८ रुपयांचा प्लान बदलून आता ३०० रुपयांचा नवाकोरा प्लान आणल्यामुळे आता ३०० रुपयात आयडिया यूजर्सला अनलिमिटेड लोकल एसटीडी कॉलिंग आणि दररोज १ जीबी ४जी डेटा मिळणार आहे.

१९९ रु. किंवा त्यापेक्षा वरचा प्लान जे पोस्टपेड यूजर्स वापरत असल्यास ते हा नवा टेरिफ प्लान घेऊ शकतील. जे आयडिया यूजर्स ४९९ रुपये किंवा त्याच्या वरचा प्लान वापरत असल्यास त्यांना ही ऑफर एक महिन्यासाठी फ्री मिळणार आहे. तर ३४९ आणि ४९९ रुपयांमधील प्लान वापरणाऱ्या यूजर्सला ही ऑफर डिस्काउंट प्राइज म्हणजेच ५० रु. दर महिन्याला याप्रमाणे तीन महिनपर्यंत ही ऑफर मिळू शकते. जे यूजर्स १९९ चे ३४९ रुपयांचा प्लान वापरतात त्यांना ही ऑफर प्रत्येक महिन्याला २०० रुपये देऊन तीन महिन्यापर्यंत मिळू शकते.

त्याचबरोबर कंपनीने स्पष्ट केले आहे की, तीन महिन्यानंतर यूजर्सला १ जीबी डेटा आणि फ्री अनलिमिटेड कॉलिंगसाठी ३०० रुपये द्यावे लागणार आहेत. या ऑफरसाठी यूजर्सला ३० एप्रिलपर्यंत हा प्लान सब्सक्राइब करावा लागणार आहे.

Leave a Comment