लवकरच २०० रूपयांची नोट चलनात?


नोटबंदी नंतर ५०० व २ हजार रूपये मूल्याच्या नव्या नोटा चलनात आणल्यानंतर मोदी सरकार व रिझर्व्ह बँकेने दोनशे रूपये मूल्याची नवी नोट चलनात आणण्याची तयारी सुरू केली असल्याचे वृत्त आहे. गुरूवारी नोटा सुरक्षा फिचर्स बदलण्यासंदर्भात झालेल्या गृह व वित्त मंत्रालयाच्या उच्च स्तरीय बैठकीत नव्या २०० रूपयाच्या नोटा वितरणात आणण्यासंदर्भातही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

या २०० रूपयांच्या नव्या नोटा हिरव्या रंगाच्या असतील व त्यातील सुरक्षा फिचर्स आणखी खास असतील असेही सांगितले जात असून या नोटांचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. अर्थमंत्रालयाकडून २०० रूपयांच्या नोटा चलनात आणण्याविषयीच्या बातमीला अधिकृत दुजोरा दिला गेला नसला तरी काही सूत्रांनी या नोटा चलनात आणण्याची परवानगी रिझर्व्ह बँकेला दिली गेली असून त्याची तयारी सुरू झाली असल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment