राजराजेश्वरी त्रिपुरसुंदरी मंदिरातील मूर्ती बोलतात?


आपल्या देशांत रहस्यांचे वलय असलेल्या जागांची कमी नाही. त्यातील बहुतेक रहस्यांमागचे विज्ञान पुढेही आणले गेले आहे व संबंधित ठिकाणी होणार्‍या चमत्कारांचा उलगडा वैज्ञानिकांनी केला आहे. मात्र अजूनही अशा अनेक जागा आहेत जेथील रहस्य शोधण्यात वैज्ञानिकांना अजूनही यश मिळालेले नाही. त्यातील एक आहे बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील राजराजेश्वरी त्रिपुरसुंदरी मदिर. ४०० वर्षे जुन्या या मंदिरातील मूर्ती रात्रीच्या शांत वेळी बोलत असल्याचे आवाज येथून येतात. बिहारमधील हे एकमेव तंत्रमंदिर असल्याचे सांगितले जाते.

असे सांगतात मध्यरात्री शांत वेळी अनेकदा येथून जाणार्‍या लोकांना मंदिरात बोलत असल्याचे आवाज ऐकले आहेत. आजही हे आवाज ऐकू येतात. त्यावेळी मंदिरात कुणीही नसते. त्यामुळे मंदिरात स्थापित असलेल्या १० महाविद्यांच्या प्रतिमाच आपसात बोलतात असे म्हटले जाते. अनेक वैज्ञानिकांनी याबाबत खुलासा करण्यासाठी प्रयत्न केले आहेत मात्र अखेर त्यांनाही या मंदिरात कांहीतरी अद्भूत आहे हे मान्य करावे लागले आहे.


या मंदिरातून निरव शांततेत अनेकदा स्वरगुंजनही ऐकू येते. हे मंदिर तंत्रसाधनेसाठी प्रसिद्ध आहे. येथे येणार्‍या तंत्रसाधकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात पण भाविकांच्याही सर्व मनोकामना पूर्ण होतात. येथे मुख्य देवी म्हणून राजराजेश्वरी त्रिपुर सुंदरी आहे त्याचबरोबर बंगलामुखी माता, तारामाता यांच्याबरोबरच दत्तात्रय भैरव, अन्नपूर्णा भैरव अशा दहा महाविद्यांच्या प्रतिमाही आहेत. या मंदिराचे पुजारी सांगतात येथील मूर्ती स्थापन करताना कलश पूजा केली गेली नव्हती तर तंत्रसाधनेनेच त्यांची स्थापना केली गेली होती. येथे प्रसाद म्हणून फक्त सुकामेवा दिला जातो.

Leave a Comment