देशात मोदी सरकार प्रचंड बहुमताने सत्तेवर आल्यावर कांही काळ खादीच्या मोदी कुर्त्याने देशविदेशातील तरूणांना वेड लावले होते. ही क्रेझ कांहीशी कमी होताना दिसते आहे. तोवरच उत्तरप्रदेशात मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या भगव्या कुर्त्याने धूम माजविली आहे. सध्या देशाच्या या सर्वात मोठ्या राज्यात भगवा कुर्ता व गळ्यात दुपट्टा यांना प्रचंड मागणी असल्याचे तेथील कपडे विक्रेते सांगतात.
आता क्रेझ भगव्या योगी कुर्त्याची
आजपर्यंत भाजपधार्जिण्यांना भगव्या रंगाचे वेड असते असा समज होता तो योगी कुर्त्याच्या मागणीने खोटा पाडला आहे. आज उत्तरप्रदेशातील लखनौ, कानपूर, हाथरस, मथुरा, अलाहाबाद, गोरखपूर, फैजाबाद, मेरठ, गाझियाबाद ते अगदी नॉयडा दिल्लीपर्यंत अनेक दुकानातून योगी कट कुर्त्यांची विक्री प्रचंड वाढली आहे. आजपर्यंत भगवा रंग हा साधु संन्याशांनी वापरायचा रंग म्हणून ओळखला जायचा व त्यामुळे या रंगाच्या कपड्यांची मागणी कमी होती. मात्र योगी सत्तेवर येतात ही मागणी वाढली आहे. अर्ध्या बाह्यांचा कॉटन कुर्ता २०० रूपयांत तर पूर्ण बाहीचा कुर्ता २५० रूपयांत विकले जात आहेत.