आरबीआय गव्हर्नरची दुप्पट पगारवाढ


नवी दिल्ली – केंद्र सरकारने आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल आणि डेप्युटी गव्हर्नर यांची पगारवाढ केली असून त्यांचे वाढीव वेतन १ जानेवारी २०१७ पासून लागू होणार आहे.

९० हजारांवरून उर्जित पटेल यांचे वेतन २.५ लाख एवढे झाले आहे. तर डेप्युटी गव्हर्नर असलेल्या चौघांचे वेतन ८० हजारांवरून २.२५ लाख एवढे वाढले आहे. सध्या बी.पी. कानुंगो, एस.एस. मुंद्रा, एन.एस. विश्वनाथन, विरल आचार्य हे आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या अंतर्गत असलेल्या रेग्युलेटर्सपेक्षा गव्हर्नर व डेप्युटी गव्हर्नर यांचे वेतन फारच कमी असते. आरबीआयच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, गव्हर्नर उर्जित पटेल यांचे नोव्हेंबर २०१६ चे वेतन २,०९,५०० रुपये एवढे होते. मात्र सर्व भत्ते मिळून आता उर्जित पटेल यांना महिन्याला ३.७० लाख रुपये वेतन मिळू शकते.

Leave a Comment