हिमाचलमधील निसर्गरम्य व जागृत चिंतपूर्णी धाम शक्तीपीठ


सध्या देशभरात चैत्रातील नवरात्राची धूम सुरू आहे. यज्ञात जळलेल्या सतीचे शव महादेव खांद्यावरून नेत असताना तिचे अवयव जेथेजेथे पडले ती स्थाने शक्तीपीठे म्हणून देशात पवित्र मानली जातात. हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यात पहाडावर असलेले चिंतपूर्णी धाम किंवा छिन्नमस्तिका धाम नावाने प्रसिद्ध असलेले शक्तीपीठ हे यातीलच एक असून येथे सतीदेवीची पाऊले पडली होती असे मानले जाते.

हे देवस्थान जागृत मानले जाते व येथे येणार्‍या भाविकांना सर्व चिंतांपासून मुक्ती मिळतेच पण त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. मात्र तरीही या ठिकाणाची माहिती खूपच कमी जणांना आहे. पहाडावर असलेले पिंडी स्वरूपातील देवीचे हे स्थान चार बाजूंनी शिवलिगांनी घेरलेले आहे. या स्थानापासून जवळच असलेली शिववाडी व दुसरे कालेश्वर धाम ही शिवस्थाने पहाडामध्ये दर्‍या आल्याने लुप्त झाली होती ती पुन्हा शोधली गेली आहेत. तसेच तिसरे मंदिर नारायणदेवाचे असून ज्वाला कासब मंदीर म्हणून प्रसिद्ध आहे तर चौथे मचकूंद महादेव म्हणून प्रसिद्ध आहे. अशी ही चार महादेवांची स्थाने चिंतपूर्णी मंदिराभोवती आहेत.

मंदिरात जाण्यासाठीचा मार्ग थोडा अवघड आहे मात्र अतिशय निसर्गसंपन्न परिसरात हे स्थान आहे. मंदिराचा बाहेरचा भाग सोन्याच्या पत्र्याने मढविला गेला आहे व नवरात्र काळात येथे गर्दी होते. येथे दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या सर्व चिंता दूर होतातच पण असंभव कार्येही झटक्यात पूर्ण होतात असा अनुभव भाविकांना येतो. येथे येणार्यवयांना पिंडी माँच्या दर्शनाने अध्यात्मिक आनंदाची अनुभूतीही येते असेही सांगितले जाते.

Leave a Comment