जैव इंधन विकास संशोधकांना मोठे यश मिळाले असून गवतापासून बनविलेल्या जैव इंधनाचा वापर विमानोड्डाणासाठी होऊ शकणार आहे. ग्रासोलिन नावाने हे इंधन भविष्यात विमानांसाठी वापरले जाईल. या इंधनाची कांही परिक्षणे केली जात आहेत. बेल्जियमच्या गेंट विद्यापीठातील संशोधक वे कर्न यांनी ही माहिती दिली.
गवतापासून बनलेल्या इंधनावर उडणार विमाने
ते म्हणाले, हे इंधन बनविताना मुख्यतः गवताचा वापर केला गेला. आज गवताचा मुख्य वापर जनावर्ययांच्या चार्यासाठी होतो मात्र यापुढे गवताचा वापर जैव इंधनासाठीही होऊ शकणार आहे. म्हणजे गवत हे उर्जेच्या मोठा स्त्रोत बनू शकणार आहे. गवतापासून बनत असलेल्या इंधनाचे प्रमाण कमी आहे व सध्या ते खर्चिकही आहे. मात्र लवकरच कमी खर्चात हे इंधन तयार करणे शक्य होणार आहे. त्यासाठीचे संशोधन केले जात आहे.
यात गवताची जैव क्षमता चांगली बनण्यासाठी बॅक्टेरिया मिसळले जातात. हे बॅक्टेरिया गवतातील साखरेपासून लॅक्टीक अॅसिड बनवितात. हे अॅसिड नंतर कॅप्रोइकमध्ये बदलते व त्यापासून डिकेन तयार केले जाते. हे डिकेन विमानात इंधन म्हणून वापरता येते.