नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाल्यानंतर आता घरगुती गॅसच्या किंमतीही कमी झाल्या असून आता १४.२ किलोचा गॅस सिलेंडर १४.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे.
बिना सबसिडीचा सिलेंडर ६ रुपयांनी महागला आहे. १९ किलोचा गॅस सिलेंडर २२ रुपयांनी स्वस्त झाला आहे. घरगुती गॅसच्या किंमती कमी झाल्यानंतर १४.२ किलोचा सिलेंडर आता अनुदानित नसलेला सिलेंडर आता ७११.५० रुपयांना मिळणार आहे. १९ किलोचा गॅस सिलेंडर १४१० रुपये ऐवजी १३८८ रुपयांना मिळणार आहे. सबसिडी युक्त सिलेंडर ६ रुपयांनी महागल्या नंतर तो ४३७.५० ऐवजी आता ४४३.५० रुपयांना मिळणार आहे. घरगुती तेल कंपन्यांनी एक दिलासादायक पाऊल उचलत पेट्रोलमध्ये प्रती लीटर ३.७७ रुपये आणि डिझेलमध्ये प्रती लीटर २.९१ रुपयांची घट केली आहे.