मुंबई – एसबीआयमध्ये आजपासून सहा सहयोगी बँकांचे विलीनीकरण होण्यास प्रारंभ होणार असल्याने एसबीआयने लोगो आणि जाहिरात फलकामध्येही बदल आहे. बँकेच्या लोगोमध्ये किंचित बदल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले असून त्याचा रंगही पूर्वीपेक्षा अलग दिसणार आहे.
एसबीआयने बदलला लोगो
एसबीआयच्या साईनबोर्डवरील पृष्ठभागाच्या रंगात बदल करण्यात आले असून आता तो अधिक शाई निळय़ा रंगात दिसणार आहे. यापूर्वी तो सफेद रंगात दिसत होता. याचप्रमाणे एसबीआयच्या लोगो अथवा मोनोग्राममध्येही बदल करण्यात आले आहेत. सध्या अस्तित्वात असणाऱया निळय़ा रंगापेक्षा काही प्रमाणात तो अधिक फुसट प्रमाणात दिसेल. डिझाईनच्या बाबतीत नवीन लोगो इफ्रा या फॉन्टमध्ये लिहिण्यात आला असून तो सफेद रंगात दिसेल. डिझाईन स्टार्क नावाच्या कंपनीकडून एसबीआय लोगो डिझाईन आणि रिबॅन्डिंग करण्यात आले आहे. यासाठी बँकेने आर. के स्वामी आणि डीडीबी मुद्रा या एजन्सीची मदत घेतली. एसबीआयमध्ये सहा अन्य बँकांचे विलीनीकरण करण्यात येणार असल्याने नवीन अवतारात उतरण्याचा बँकेचा प्रयत्न आहे.