उष्माघातापासून स्वत:ला वाचवा !


देशभरात उन्हाचा पारा सध्या चांगलाच वाढलेला असल्यामुळे घराबाहेर निघणेही लोकांना कठीण होऊन बसले आहे. उन्हाळ्याची ही नुकतीच सुरूवात असूनही राज्यात दोन ठिकाणी उष्माघाताने काही बळी गेले आहेत. अशात सर्व नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे. ही काळजी घेतली नाहीतर तर नागरिकांना मोठी किंमत चुकवावी लागू शकते. अनेकजण कशाचाही विचार न करता उन्हात तसेच निघून जातात. योग्य ती काळजी घेत नाहीत अशात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पुढेही तापमानाचे हे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता असल्यामुळे काही गोष्टी ध्यानात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. उष्माघातापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

* दुपारी १२ ते ३ उन्हात फिरू नका.
* उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका.
* मद्यसेवन, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रींक्स घेऊ नका, त्यामुळे डिहाइड्रेट होते.
* पार्किंग केलेल्या वाहनांमध्ये मुले किंवा प्राण्यांना सोडू नका.
* तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या.
* सौम्य रंगाचे, सैल आणि कॉटनचे कपडे घाला.
* बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.
* प्रवास करताना सोबत पाणी घ्या.
* आपले घरं थंड ठेवा, पडदे, झडपा, सनसेट बसवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा.
* उन्हात डोक्यावर छत्री, टोपीचा वापर करा. डोके, गळा, चेह-यासाठी ओल्या कापडाचा वापर करा.
* अशक्त कमजोरी असेल तर त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
* ओआरएस, घरची लस्सी, तोरणी, लिंबू पाणी, ताक इत्यादी घ्या.
* जनावरांना सावलीत ठेवा आणि पुरेसे पाणी द्या.
* फॅनचा वापर करा आणि थंड पाण्याने आंघोळ करा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment