तुमच्या खात्यात आज अचानक जमा होणार १५ लाख रुपये


मुंबई – परदेशांतील काळा पैसा भारतात आणणार, प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार असे वक्तव्य लोकसभा निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यानंतर देशातील जनतेने मोठा विश्वास ठेवला आणि त्यांना निवडणुकीत जिंकवूनही दिले. पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आणि त्यापैकी एक म्हणजे नोटाबंदी. नोटाबंदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय परदेशातील काळा पैसा भारतात आणण्यासाठी आणि भ्रष्टाचार नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर आता अनेकांना मेसेजेस येण्यास सुरुवात झाली आहे की, तुमच्या सर्वांच्याच बँक खात्यात आज १५ लाख रुपये जमा होणार हा मेसेज अनेकांना व्हॉट्सअॅपवर येण्यास सुरुवात झाली आहे. हा मेसेज वाचून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. आपल्या बँक खात्यात १५ लाख जमा होणार ही प्रत्येकासाठीच एक आंदाची बातमी आहे. तसे म्हटले तर, अत्यंत दु:खाची आणि अतिआनंद देणारी एखादी बातमी पचवायलाही मनाची तयारी करावी लागते.

तुम्हालाही तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याचा SMS किंवा व्हॉट्सअॅप मेसेज आला असेल तर, तुम्ही उत्साहाच्या भरात काही आगळे-वेगळे पाऊल उचलू नका…. कारण, आज १ एप्रिल आहे. १ एप्रिल म्हणजेच ‘एप्रिल फूल’ करण्याचा दिवस. १५ लाख रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार हा मेसेजही एप्रिल फूलचाच एक भाग आहे. पण तुम्ही नाराज होऊ नका तर हा मेसेज तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींना तसेच इतर सहका-यांना फॉरवर्ड करुन त्यांची फिरकी घेऊ शकता.

1 thought on “तुमच्या खात्यात आज अचानक जमा होणार १५ लाख रुपये”

Leave a Comment