सायकलच, किंमत फक्त २५ लाख रूपये


छानछेाकीच्या लाईफस्टाईलची तुम्हाला आवड असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. लग्झरी कार्स मॉडेल्स आणि दमदार बाईकस निर्माती फ्रान्सच्या बुगाती ने जगातली सर्वात हलकी व अतिवेगवान सायकल तयार केली आहे. जर्मन कंपनी पीजी च्या सहकार्याने तयार केलेल्या या सायकलची किंमत फक्त २५ लाख रूपये आहे. पाच किलो वजनापेक्षाही कमी वजनाची ही सायकल उच्च दर्जाच्या कार्बन फायबरपासून बनविली गेली आहे व ती अतिशय मजबूत आहे.

एका खास कारसारखी एका खास सायकल असे स्लोगन असलेल्या या सायकलची फक्त ६६७ युनिट तयार केली जाणार आहेत. विमानासाठी वापरलेल्या धातूचा वापर यात केला गेला आहे. सिंगल स्पीड, सिंगल चेन व सिंगल सीटची ही सायकल बेल्टच्या सहाय्याने चालते. म्हणजे पॅडलकडून चाकापर्यंत द्यावी लागणारी पॉवर बेल्टच्या माध्यमातून दिली जाते. यात एरोडायनामिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. बुगाती कारच्या मालकाला कारला मॅचिंग सायकल बनवून दिली जाणार असल्याचेही कंपनीने जाहीर केले आहे.

जगात महागड्या सायकलींची अनेक मॉडेल्स आहेत व त्यातील बहुसंख्य महागड्या कारनिर्मात्या कंपन्यांनीच बनविलेली आहेत. अॅस्टन मार्टिन कंपनीची सायकलही साधारण २५ लाख रूपयांतच उपलब्ध असून वन ७७ असे तिचे नामकरण केले गेले आहे. ऑडीच्या ई सायकल साडेबारा लाखात तर फेरारीने हाताने बनविलेल्या ३० सायकल प्रत्येकी साडेसहा लाख रूपये किमतीच्या आहेत. बीएमडब्ल्यू च्या सायकली ८६ हजारापासून दोन लाखांपर्यंत आहेत तर वेगवान सायकलीतील एक अशी प्रसिद्धी असलेल्या तैवानी कंपनीच्या प्रोपेल अॅडव्हान्स झिरो सायकलची किंमत आहे १०.६० लाख रूपये.

Leave a Comment