बंगलोरच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप कंपनी एमफ्लक्सने पहिल्या इलेक्ट्रीक सुपरबाईकचे डिझाईन व निर्मिती केली असून ही स्पोर्टस बाईक आहे. ६०० ते ६५० सीसीच्या मोटर इंजिनाइतकी क्षमता या बाईकला दिली गेली असून तिचा टॉप स्पीड आहे ताशी १७० किमी. म्हणजे ही बाईक जणू वार्याशी स्पर्धा करणार आहे. ही बाईक ० ते १०० चा वेग अवघ्या ३.५ सेकंदात घेऊ शकणार आहे.
पहिल्या इलेक्ट्रीक सुपरबाईकची बंगलोरमध्ये निर्मिती
ही बाईक एकदा चार्ज केली की २०० किमीचे अंतर न थांबता काटू शकेल. ३६ मिनिटांत ही बाईक ८० टक्के चार्ज होईल. पुढच्या वर्षीच्या ऑटो एक्स्पोमध्ये ती सादर केली जाणार आहे. कंपनीचे सीईओ वरूण मित्तल म्हणाले की या इलेक्ट्रीकल स्पोर्टस बाईकचे डिझाईन, इंजिन, चासी संपूर्णपणे स्वदेशी आहे. या बाईकचे मामकरण मॉडेल वन असे केले गेले असून तिचे टेस्टींग सुरू आहे.जून २०१७ पर्यत ती पूर्ण होईल, सुरवातीला या बाईकची फक्त २०० युनिट बनविली जाणार आहेत व तिची किंमत साधारण ५ लाख रूपये असेल. त्यानंतर मॉडेल टू व मॉडेल थ्री या नावाची व्हेरिएंटही कंपनी तयार करणार आहे.