पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी घसरण


नवी दिल्ली: ब-याच कालावधीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी घसरण झाली असून पेट्रोल ३.७७ रुपये तर डिझेल २.९१ रुपयांनी स्वस्त झाले असून हे नवे दर मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

यापूर्वी १ जानेवारी रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यावेळी पेट्रोलच्या दरात १ रुपया २९ पैशांनी वाढ करण्यात आली होती तर डिझेलच्या दरात ९७ पैशांनी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे आता पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत नव्या वर्षातील आणखीन एक दरवाढ झाली. त्यानंतर १५ जानेवारीला पेट्रोल डिझेलचे भाव वाढवण्यात आले होते. पेट्रोलच्या दरात ४२ पैशांनी वाढ करण्यात आली होती तर डिझेलच्या दरामध्ये १ रुपया ३ पैशांनी वाढ करण्यात आली होती.

कच्च्या तेलाच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात वाढल्याने भारतातील तेल उत्पादन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. कच्च्या तेलाच्या बदलेला दरांचा आणि रुपया-डॉलरच्या विनिमयाचा आढावा घेत हे दर ठरवले जातात. पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत.

Leave a Comment