मोटोने घेतला जी५च्या प्रमोशनसाठी मराठीचा आधार


४ एप्रिल रोजी मोटोरोला आपला नवा फोन मोटो जी५ लाँच करणार असून त्याच्या प्रमोशनची देखील कंपनीने सुरूवात केली आहे. यावेळी मोटोने एक अनोखा फंडा वापरला आहे. @MotoIndia या ऑफिशिअल पेजवरून मोटोने चक्क मराठीत ट्विट केले आहे. आणि हे ट्विट अनेक मराठी ग्राहकांना नक्कीच आकर्षित करत आहे.

मराठी ट्विटवरुन मोटोरोलाने केलेल्या नेमका अंदाज बांधणे तसे अवघडच आहे. पण हे ट्वीट मोटो जी५च्या प्रमोशनसाठी आहे का? असा प्रश्न नेटीझन्सना पडला आहे. पुणेरी ढोल, पुणेरी मिसळ आणि काहीतरी स्पेशल! लवकरच, काहीतरी दमदार होणार आहे! असे ट्विट मोटोरोलाने केले आहे. त्यामुळे मोटोरोला पुण्यात नवे काही सुरु करणार आहे का? असाही अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व गोष्टींवरुन नेटीझन्सने मात्र अनेक अर्थ लावण्यास सुरुवात केली आहे. पण नेमके हे कशासाठी केले आहे हे लवकरच स्पष्ट होईल. मोटो इंडियाने एकूण ५ ट्वीट मराठीतून केले आहेत. या सर्व ट्विटला ट्विपल्सने मोठ्या प्रमाणात रिप्लायही दिले आहेत. एकूणच ‘मोटो’चा मराठी ट्वीट मागचा नेमका ‘मोटो’ काय हे येता काही दिवसात सर्वांसमोर येईलच.

Leave a Comment