उद्यापासून घ्या विकत


मुंबई – जिओची ‘हॅप्पी न्यू इअर’ मोफत सेवा १ एप्रिलपासून बंद होणार असून सहा महिन्यापूर्वी सुरु करण्यात आलेल्या या ऑफरनुसार ग्राहकांना फ्री कॉलिंग आणि डेटा प्लान देण्यात आला होता. मात्र आता ही मोफत सेवा बंद होत असून ग्राहकांना इतर पर्याय देण्यात आले आहेत. जिओची प्राईम मेंबरशीप हवी असल्यास आज शेवटची मुदत असून ३१ मार्चनंतर ही ऑफरही बंद केली जाणार आहे. प्राईम मेंबरशीप घेतल्यास दर महिन्याला ३०३ रुपये मोजावे लागतील. यामध्ये २८ जीबी ४जी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे.

जिओला प्राईम मेंबरशिप ऑफरमध्ये अपेक्षित ग्राहकांपैकी केवळ ५० टक्के ग्राहकांना कायम ठेवण्यात यश आले आहे. याशिवाय जिओने ४९९ रुपयांचा देखील एक प्लान आणला आहे. प्राईम मेंबरशीपसाठी यूजर्सला ९९ रुपये द्यावे लागणार आहेत. यानंतर १२ महिन्यांसाठी ३०३ रुपयांचा प्लान घेऊन हॅप्पी न्यू इअर ऑफरमध्ये मिळणा-या सुविधांचा पुढील एक वर्षापर्यंत फायदा घेऊ शकतात. गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जिओची सेवा ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. 4जी स्पीडसह अनलिमिटेड इंटरनेट जिओनं मोफत पुरवल्यामुळे ग्राहकांच्या जिओवर अक्षरशः उड्या पडल्या होत्या.

तुम्ही प्राईम मेंबरशीप न घेतल्यास १ एप्रिलपासून तुम्हाला रिचार्ज करावा लागेल. माय जिओ अॅपवर तुम्हाला प्रीपेडचे विविध प्लान दाखवले जातील. त्याप्रमाणे तुम्हाला एक प्लान निवडून रिचार्ज करावा लागेल. जिओ स्टोअर वरुनही तुम्ही रिचार्ज करु शकता. जर तुम्ही पोस्टपेड ग्राहक असाल तर तुम्हाला कोणताही एक प्लान घ्यावा लागेल. आपले सीम प्रीपडे आहे की पोस्टपेड हे ओळखण्यासाठी माय जिओ अॅपवर लॉग इन केल्यानंतर माय प्लानवर जा. तिथे तुम्हाला हॅप्पी न्यू ईयर दिसेल. तिथेच वरती तुम्ही प्रीपेड ग्राहक आहात की पोस्टपेड हे दिसेल.

Leave a Comment