जपानची गुंतवणूकदार कंपनी सॉफ्टबँक सध्या अनेक अडचणींचा सामना करत असलेली स्नॅपडील व तिची सर्वात मोठी स्पर्धक फ्लिपकार्ट यांच्या विलयाच्या शक्यता पडताळून पाहत आहे. जर हे विलीनीकरण झाले तर भारताच्या ई कॉमर्स मार्केटचा चेहरामोहराच बदलला जाणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाने या संदर्भात रिपोर्ट दिला आहे.
स्नॅपडील- फ्लिपकार्टच्या विलयासाठी सॉफ्टबँक प्रयत्नशील
या अहवालानुसार स्नॅपडील व फ्लिपकार्टच्या विलीनीकरणानंतर सॉफ्टबँक नवीन कंपनीत दीड अब्ज डॉलर्सची नव्याने गुंतवणूक करणार आहे. तसेच प्रायमरी व सेकंडरी शेअर्सचा जादा हिस्साही घेणार आहे. म्हणजे नव्या कंपनीचे १५ टक्के शेअर्स त्यांच्याकडे असतील. सॉफटबँक ही स्नॅपडीलमधील सर्वात मोठी गुंतवणूकदार कंपनी असून त्यांच्याकडे कंपनीचे ३० टक्कयांहून अधिक शेअर्स आहेत. त्याची २०१६ मधली किंमत ६.५ अब्ज डॉलर्स इतकी आहे.
फ्लिपकार्टमधली सर्वात मोठी गुंतवणूकदार कंपनी टायगर ग्लोबल ही असून त्यांच्याकडेही कंपनीचे ३० टक्के शेअर्स आहेत. विलीनीकरणानंतर ही कंपनी त्यांच्या १० टक्के शेअसची विक्री करेल असेही सांगितले जात आहे.