स्टेम सेल म्हणजे गर्भाच्या नाळेतील मूळ पेशींपासून भविष्यात संबंधित व्यक्तीवर उपचार करण्याचे शास्त्र आता चांगलेच रूळले असतानाच दुधाच्या दाताजवळील मूळ पेशीही व्याधी उपचारांसाठी अत्यंत लाभदायक ठरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नाळेतील मूळ पेशींबरोबरच आता दुधाच्या दातांजवळील पेशीही स्टोअर करून ठेवता येणार आहेत. या पेशी म्हणजे लहान मुलांचा जैव विमा असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जयपूरमधील खासगी रूग्णालयाने या पेशी जतन करून ठेवण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. या पेशी किवा दात वयाच्या २१ व्या वर्षापर्यंत सव्वा लाख रूपये भरून जतन करता येणार आहेत.
दातांमधील स्टेमसेलपासून दंतधातूची निर्मिती होत असते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मांसपेशींची दुरूस्ती, सांध्यातील कार्टिलेज किंवा गाद्या, हृदयाच्या नुकसान झालेल्या पेशींची दुरूस्ती, मेंदूतील पेशी, हाडांतील वसा या संदर्भातील व्याधींवर या पेशींमुळे उपचार शक्य आहेत. गर्भनाळेतील मूळ पेशींपासून रक्तातील व्याधी दूर करता येतात मात्र डेंटल पल्प स्टेम सेलच्या उपचारात डोळ्यातील कार्निया, मेंदू विकार, मधुमेह, नवीन केस उगविणे, किडनी व यकृत आजार, स्नायू व मसल टेान, मणक्यातील व्याधी दुरूस्त करता येतात. दातांच्या जवळच्या हिरड्यातून या पेशी मिळविता येतात व लहान बालकांप्रमाणे वयाच्या ३० वर्षांपर्यंतच्या व्यक्तींच्या पेशीही सुरक्षित ठेवता येतात. वयाच्या ३० नंतर या पेशींची संख्या कमी होत जाते.
सध्या ज्याच्या दातांतून अशा मूळ पेशी काढल्या जातात त्यांच्यावरच उपचार करता येतात मात्र भविष्यात रक्ताचे आईवडील, बहीण भाऊ यांच्यावरही उपचार शकय होतील असे सांगितले जात आहे. काय्रोजनिक टँकमध्ये या पेशी उणे १५६० तपमानात जतन केल्या जातात.