जमीन,समुद्रात उतरू शकणारे महाकाय विमान चीनमध्ये तयार


जमीनीप्रमाणेच समुद्राच्या पाण्यावर उतरू शकणारे जगातील सर्वात मोठे विमान चीनमध्ये पहिल्या उड्डाणासाठी सज्ज झाले आहे. मे महिन्यात एजी ६०० हे महाकाय विमान प्रथम जमिनीवरून उड्डाण करेल. समुद्रातले त्याचे पहिले उड्डाण व लँडीग या वर्षअखेर केले जाईल असे समजते. चिनी एव्हीएशन इंडस्ट्री कॉर्प ऑफ चायनाने हे विमान तयार केले आहे.

हे विमान बोईंग ७३७ या विमानाच्या आकाराचे असून जमीन व पाण्यावर उतरू शकणारे जगातील ते सर्वात मोठे विमान आहे. गेली आठ वर्षे या विमानाची निर्मिती सुरू होती. चीन सध्या उपग्रह प्रतिरेाधी मिसाईल्स पासून ते रडार टिपू शकणार नाही अशी विमाने असा सैन्य आधुनिकीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबवित आहे. त्यात स्वदेशी विमानवाहन नौकाही तयार केल्या जाणार आहेत.

Leave a Comment