नवी दिल्ली – शाओमी या चिनी स्मार्टफोन कंपनीने आगामी तीन वर्षात २० हजार रोजगाराची भारतात निर्मिती करणार असल्याची माहिती दिली. शाओमीचे संस्थापक, अध्यक्ष आणि सीईओ असणारे लेई जुन हे आठवडय़ाच्या भारत दौ-यावर आले असून त्यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. यावेळी कंपनीच्या भविष्यातील रणनीतिची चर्चा करण्यात आली. याचवेळी त्यांनी अर्थमंत्री जेटली आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचीही भेट घेतली.
भारतात २० हजार रोजगाराची निर्मिती करणार शाओमी
आंध्र प्रदेशातील श्रीसिटी येथील दुसरा प्रकल्प कंपनीने काही दिवसांपूर्वी कार्यरत केला आहे. नजीकच्या १०० गावातील ५ हजार व्यक्तींना रोजगार दिला जात आहे. या ठिकाणी कार्यरत असणा-यांपैकी ९० टक्के या महिला आहेत. या प्रकल्पातून कंपनीचा नवीन हॅन्डसेट रेडमी ४ए चे उत्पादन घेण्यात येत आहे. आगामी तीन वर्षात देशात २० हजार रोजगारनिर्मिती करण्याचे आपले उद्दिष्टय़ आहे. चीनबाहेर कंपनीसाठी भारत ही महत्त्वाची बाजारपेठ आहे, असे कंपनीने निवेदनात म्हटले.