एसबीआय देणार २० हजार बँक खात्यात असल्यास क्रेडिट कार्ड


मुंबई – प्रत्येक खातेधारकाच्या खात्यात २० हजार ते २५ हजार रुपये शिल्लक असल्यास क्रेडिट कार्ड देण्याची तयारी भारतीय स्टेट बँक या सरकारी बँकेकडून करण्यात येत असून या योजनेनुसार बँक खातेधारकाची कोणतीही माहिती जमा केल्याशिवाय (क्रेडिट) कार्ड देण्यात येणार आहे.

एसबीआयच्या नियंत्रणाखाली कार्यरत असणा-या एसबीआय कार्डमधील आपली हिस्सेदारी ७४ टक्के करण्यात आली आहेत. एसबीआय कार्डमधील ११६८ कोटी रुपयांची हिस्सेदारी एसबीआयने खरेदी केली आहे. ही हिस्सेदारी जीई कॅपिटलकडून खरेदी करण्यात आली आहे. जीई कॅपिटल आपली उर्वरित इक्विटी हिस्सेदारी एका खासगी गुंतवणूकदाराला विक्री करणार आहे. क्रेडिट कार्डचा वापरासाठी प्रोत्साहित करणे आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी एसबीआयकडून हा प्रयत्न करण्यात येणार आहे.

भारतासारख्या देशात क्रेडिट कार्डचा वापर वाढविण्याचे मोठे आव्हान असल्यामुळे नवीन ग्राहकांच्या खात्यामध्ये २० हजार ते २५ हजार रुपये शिल्लक असतील तर त्यांना क्रेडिट कार्ड देण्याचा विचार सुरू आहे, असे एसबीआयच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी म्हटले.

साधारण ३० कोटी ग्राहकांची खाती एसबीआयने बंद केली आहेत. यामध्ये जन धन खात्यांचाही समावेश आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर या खात्यांमध्ये जमा करण्यात आलेल्या रकमेमध्ये वाढ दिसून आली होती. देशातील सर्व ग्राहकांची क्रेडिट इतिहास नाही आणि ते कार्डसाठी पात्र नाहीत. मात्र नवीन सेवेच्या माध्यमातून पेडिट सेवेमध्ये अनेक लोकांना आणण्याचा प्रयत्न सुर आहे, असे एसबीआय कार्डचे सीईओ विजय जसूजा यांनी म्हटले.

Leave a Comment