सॅमसंग गॅलक्सी एस-८ आणि एस-८ प्लस स्मार्टफोन लाँच


न्यूयॉर्कमध्ये आयोजित ‘अनपॅक्ड २०१७’ या कार्यक्रमात सॅमसंगने गॅलक्सी सीरिजचे लेटेस्ट प्रीमियम स्मार्टफोन लाँच केले असून गॅलक्सी एस-८ आणि एस-८ प्लस हे दोन नवीन मॉडेल लाँच करण्यात आले आहेत. २१ एप्रिलपासून ग्राहकांना हे दोन्ही मॉडेल्स उपलब्ध करण्यात येणार आहे. मात्र, याची किंमत व भारतीय बाजारात हा फोन कधी येणार याबाबत सॅमसंगने अद्याप खुलासा केलेला नाही.

सॅमसंग गॅलक्सी एस८ मध्ये ५.८ इंच आणि गॅलक्सी एस८ प्लसमध्ये ६.२ इंच डिस्प्ले आहे. दोन्ही फोनमध्ये रिझोल्यूशन १४४०×२९६० पिक्सल आहे. या स्मार्टफोनचे कर्व्ह्ड एज देण्यात आले आहेत. या स्मार्टफोनमध्ये इनव्हिजिबल होम बटण देण्यात आले आहे. डिव्हाईसच्या रिअर पॅनलच्या कॅमेऱ्याखाली फिंगरप्रिंट सेन्सरही देण्यात आले आहे. गॅलक्सी एस८ आणि एस८ प्लसमध्ये १२ मेगापिक्सल रिअर कॅमेरा तर ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. गॅलक्सी एस८ आणि एस८ प्लसच्या प्रोसेसरसाठी कंपनीने १०nm चिपसेट तयार करण्यात आल्यामुळे बॅटरी लवकर संपणार नाही. दोन्ही फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबीचे स्टोरेज देण्यात आले आहे. .

गॅलक्सी एस८मध्ये ३००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तर एस८प्लसमध्ये ३५०० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. काळा, ऑर्किड ग्रे, करडा, सोनेरी आणि निळ्या अशा पाच रंगात हे दोन्ही फोन उपलब्ध असणार आहेत.

Leave a Comment