५४ वर्षीय व्यक्तीने बनविले मारूतिचे इंजिन लावून हेलिकॉप्टर


नवी दिल्ली: एका व्यक्तीने गेल्या काही दिवसांपूर्वी दोन सीटर हेलिकॉप्टर बनवून रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. केरळच्याच एका ५४ वर्षीय डि.सदासिवनने आता एक कारनामा केला आहे. सदासिवनने लहान मुलांसाठी हेलिकॉप्टर मॉडल तयार करता करता खरोखरचे हेलिकॉप्टर तयार केले आहे. एका महिन्यानंतर जे पहिले टेस्ट उड्डाण करणार आहे.

हेलिकॉप्टर तयार करण्यासाठी त्या गोष्टीचे शिक्षण असणे गरजेचे आहे. मात्र कोणतही असे शिक्षण घेतलेले नसताना या व्यक्तीने खरे हेलिकॉप्टर बनविले आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी सदासिवनला लहान मुलांसाठी हेलिकॉप्टरचे मॉडल तयार करण्यासाठी सांगितले होते. त्याने खरोखरच हेलिकॉप्टर तयार केले आहे.

अ‍ॅल्युमिनियमच्या आणि लोखंडाच्या मदतीने हे हेलिकॉप्टर तयार करण्यात आले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या हेलिकॉप्टरला त्याने चक्क मारूति ८०० या कारचे इंजिन बसवले आहे. गिअर बॉक्सच्या प्रयोगासोबतच ऑटोरिक्षाच्या काचेचाही यासाठी वापर करण्यात आला आहे. मंगळवारी हे हेलिकॉप्टर शाळेतील मुलांसमोर सादर करण्यात आले आहे.

केवळ १०वी शिकलेले सदासिवन हे केरळच्या कंजिरापल्लीमध्ये एक इंजिनिअरींगचे शॉप चालवतात. त्यानी सांगितले की, माझी मुलगी ज्या शाळेत शिकते त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी मला हेलिकॉप्टरचे मॉडल तयार करण्यासाठी सांगितले होते, त्यानंतर मी या कामाला सुरूवात केली. हे तयार करण्यासाठी मला तब्बल चार वर्ष इतका वेळ लागला आहे.

Leave a Comment