मायक्रोमॅक्सचा ड्युअल ५ स्मार्टफोन लॉन्च


ड्युअल बॅक कॅमेरा सेटअप असलेला स्मार्टफोन भारतीय मोबाईल उत्पादक कंपनी असलेल्या मायक्रोमॅक्सने लॉन्च केला असून ड्युअल ५ असे या नव्या स्मार्टफोनचे नाव आहे. हा मायक्रोमॅक्सच्या ड्यूअल सीरीजचा पहिलाच स्मार्टफोन आहे. यानंतर कंपनी लवकरच ड्युअल ४ स्मार्टफोनही लॉन्च करणार आहे. ड्युअल ५ मध्ये अनेक नवे आणि शानदार फिचर्स देण्यात आले आहेत.

आपल्या ड्यूअल बॅक कॅमेरा सेटअपमध्ये मायक्रोमॅक्सने १३ मेगापिक्सलचे दोन सोनी IMX258 सेंसर वापरले आहेत. त्यातील एक मोनोक्रोम लाइट कॅप्चर करतो तर दुसरा RGB. दोघांचही अपर्चर f/1.8 आहे. यात कवर टेंपरेचर सेंसर लावण्यात आले आहे जे कॅप्चर करण्यात आलेल्या दोन फोटोंचा एक फोटो बनवतो.

यातील एक कॅमेरा फोकससाठी वापरला जातो आणि दुसरा डेप्थ फिल्ड इन्फर्मेशनसाठी वापरला जातो. ड्युअल कॅमेरा मोड स्मार्टफोनमध्ये हा आधीच ऑन असतो. यात बोके मोड आणि लो लाइट मोड सुद्धा आहेत. पॅनो, प्रो, स्लो, शटडर, एंटी हेज, मोनोक्रोम आणि मॅक्रोसारखे मोड्सही यात देण्यात आले आहेत. बॅक कॅमेरा ४के अल्ट्रा हाय डेफिनिशन रिझोल्यूशनवर व्हिडिओ बनतो. कंपनीनुसार, ड्य़ूअल बॅक कॅमेरा सेटअपच्या मदतीने 3D व्हिडिओही बनवला जाऊ शकतो.

फ्रन्टला १३ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात १.१२ मायक्रॉन पिक्सल सोनी IMX258 सेंसर देण्यात आला आहे. डिस्प्ले आणि अ‍ॅन्ड्रॉईड ६.०.१ मार्शमॅलोवर चालणारा मायक्रोमॅक्स ड्यूल ५ मध्ये ५.५ इंचाची फुल एचडी एमोलेड २.५ डी कर्व्हड डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यावर कॉर्निंग गोरिला ग्लास ३ प्रोटेक्शन लावण्यात आले आहे. डिप्स्लेचे रिझोल्यूशन १०८० x १९२० पिक्सल आहे.

हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६५२ MSM८९७६ प्रोसेसरवर रन करतो, ज्यात ४ Cortex-A७२ १.८GHz वर आणि ४ Cortex-A५३ कोर १.४GHz वर क्लॉक केले गेले आहेत. रॅम ४ जीबी देण्यात आली आहे. मायक्रोमॅक्स ड्य़ूल ५ स्मार्टफोनमध्ये मायक्रोमॅक्स केअर अ‍ॅप आहे. कंपनीने याद्वारे २४ तासात सर्व्हिस देण्याचा दावा केला आहे. फोनसोबत १ वर्षाची रिल्पेस वॉरंटीही मिळेल. मायक्रोमॅक्स ड्युअल ५ या स्मार्टफोनला २४ हजार ९९९ रूपयांमध्ये लॉन्च करण्यात आले आहे. हा फोन फ्लिपकार्टवर १० एप्रिलपासून उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment