नवी दिल्ली : खास आपल्या ग्राहकांसाठी जपानची प्रसिद्ध वाहन निर्माता कंपनी होंडाने आपली नवी माय २०१७ मॉडेलची डिओ भारतामध्ये नुकतीच लाँच केली असून डिस्क ब्रेक्सही या मॉडेलमध्ये देण्यात आले आहेत. तसेच या नव्या डिओमध्ये स्टायलिश असे लूक देण्यात आले आहे.
होंडाची बीएस ४ इंजिनसह नवी डीओ लाँच
या डिओमध्ये ७००० आरपीएमवर ८ बीएचपीचा पॉवर आणि ८.९१ एनएमचा टार्क निर्माण करण्याची क्षमता असणारे इंजिन देण्यात आले आहे. त्याचबरोबर टय़ूबलेस टायर्स कॉम्बी-ब्रेकिंग सिस्टिम आणि डिस्क ब्रेक्सही देण्यात आले आहे. ग्राफिक्स स्टायलिश लूक देण्यात आले आहे. या बाइकच्या फ्रंटला एलईडी लाईट आणि सीटच्या खालील बाजूस मोबाईल चार्जिंग पोर्टही देण्यात आले आहे.