४ एप्रिलला भारतात लाँच होणार मोटो जी५


मुंबई: भारतात ४ एप्रिलला आपला नवा स्मार्टफोन जी५ मोटोरोला लाँच करणार आहे. या स्मार्टफोनच्या लाँचिंगसाठी कंपनीने मीडियाला निमंत्रणही पाठवली आहेत.

कंपनीने याच महिन्यात जी५ प्लस लाँच केला होता. पण तेव्हा त्यांनी आपला जी५ डिव्हाइस लाँच केला नव्हता. पण आता कंपनीने हा स्मार्टफोन बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. जी५ च्या २जीबी रॅम/१६जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत जवळजवळ १४००० रु. आहे. पण भारतात याची किंमत किती असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मोटोरोला जी५ स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर असणार आहे. होम बटनमध्ये इंटिग्रेटेड असणार आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड ७.० नॉगट ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित मोटो जी५ मध्ये ५ इंच स्क्रिन आणि १०८०×१९२० रिझोल्यूशनचा डिस्प्ले देण्यात आला आहे. १.४GHz स्नॅपड्रॅगन ४३० प्रोसेसर आहे, मोटो जी५ २/३ जीबी रॅम व्हेरिएंट आहे. या डिव्हाइसची इंटरनल मेमरी १२८ जीबीपर्यंत वाढवता येणार आहे. यात १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असणार आहे.

Leave a Comment