२०० रुपयात वर्षभराचे इंटरनेट देणार डाटाविंड


नवी दिल्ली – २०० रुपयात वर्षभराचा डेटा ( इंटरनेट) कॅनडाची मोबाईल बनवणारी डाटाविंड कंपनी देणार असे दिसून येत आहे. कंपनी यासाठी १०० कोटींची व्यवसायिक गुंतवणूक करणार आहे, ज्याचा वापर पहिल्या सहा महिन्यांत दूरसंचार सेवा परवाना प्राप्त झाल्यानंतर स्वत:साठी करणार आहे.

संपूर्ण देशभरात व्हर्च्युअल नेटवर्क पसरवण्यासाठी स्वस्त स्मार्टफोन आणि टॅब्लेट बनवणाऱ्या कंपनीने सेवा परवाना मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. कंपनी परवाना प्राप्त केल्यानंतर डेटा सेवा आणि मोबाईल टेलिफोन सेवा देण्यास सक्षम असेल, पण फक्त विद्यमान दूरसंचार सेवा देणारा भागीदार मिळाल्यानंतरच कंपनी ही सेवा देवू शकते.

पंजाबी पत्रकारांशी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी सुनित सिंग तूली हे म्हणाले, आम्हाला एका महिन्याच्या आत परवाना मिळण्याची अपेक्षा आहे. डाटाविंड व्यवसायाच्या सुरूवातीच्या ६ महिन्यांतच १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. कंपनीचे लक्ष पूर्णत: डेटा सेवांवर केंद्रित राहील. डाटाविंडने ३जी तंत्रज्ञानावर आधारित ‘विद्याटॅब-पंजाबी’ मोबाईल आणला आहे. ज्याची किंमत ३,९९९ रुपये आहे.

तुलीने सांगितले, की कंपनी अशी डेटा सेवा देणार आहे ज्याची किंमत दरमहा २० रुपये किंवा त्यापेक्षा कमी असेल. जिओची ३०० रुपयेची योजना केवळ त्यांच्यासाठी आहे जे दरमहा १,०००-१,५०० रुपये खर्च करू शकतात, ज्यांची संख्या फक्त ३० कोटी आहे. आम्ही दरमहा २० रुपये किंवा त्यापेक्षा कमीचा प्लान ग्राहकांना देणार आहोत ज्याने वर्षभर इंटरनेटचा खर्च फक्त २०० रूपये येणार आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Comment