नमो अॅपवर पाहता येणार नमो टिव्ही


डिजिटल इंडियाचा नारा देणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे म्हणणे, विचार देशातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचविता यावेत यासाठी ननो अॅप लाँच केले होते. आता या अॅपमध्ये नवीन सेक्शन अॅड करण्यात आला असून नमो टिव्ही या नव्या सेक्शनमध्ये युजर पंतप्रधानांचे कार्यक्रम त्यांची भाषणे लाईव्ह पाहू शकणार आहेत. मनो अॅपमुळे सर्वसामान्य नागरिक पंतप्रधानांशी थेट जोडले गेले आहेत आणि आपले म्हणणे, आपल्या कल्पना व आपली मते थेट पंतप्रधान कार्यालयाकडे ते पाठवूही शकत आहेत.

नव्या सेक्शनमुळे युजर कृषी, युवा विकास शिवाय टेक्नॉलॉजी विषयांवरील मोदींची भाषणे पाहू शकणार आहेत. मोदींची सर्व भाषणे या सेक्शनमुळे लाईव्ह पाहणे शक्य होणार आहे तसेच पूर्वी झालेली भाषणे अर्काइव्ह वर उपलब्ध होणार आहेत. युजरला केंद्र सरकार करत असलेली कामे, त्यांचे निर्णय यावर मराठीतूनही प्रतिक्रिया देता येणार आहेत. पूर्वी इंग्रजी, हिदी, गुजराथी, कन्नड, मल्याळी भाषा यासाठी वापरता येत होत्या आता मराठीबरोबर बंगाली, उरीया, तेलगू प्रादेशिक भाषांचा वापर युजर करू शकणार आहेत. या सेक्शनमध्ये मोदींचे रोजचे अपडेट मिळतील तसेच पंतप्रधानांशी चर्चेची संधीही मिळू शकणार आहे. हे अॅप अँड्राईड युजरच वापरू शकणार आहेत.

Leave a Comment