ये कौनसा पोकेमॉन है भाई ?


सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या दोन डोके आणि तीन डोळ्यांच्या प्राण्याच्या फोटोने सगळ्यांनाच संभ्रमात टाकले असून हा विचित्र दिसणारा प्राणी नक्की आहे तरी कोण याचे उत्तर कोणाला शोधूनही सापडेना बुवा. त्यामुळे या प्राण्याचे गाव शोधून काढायचे असा चंगच नेटीझन्सने बांधला आहे. तुम्ही यापूर्वी हा अजब प्राणी कधीही पाहिला नसेल, त्यामुळे त्याला पाहून ये कौनसा पोकेमॉन है भाई ? असे प्रश्न साहजिकच तुमच्या मनात आले असतील. असा प्रश्न पडणारे तुम्ही काही पहिले व्यक्ती नाहीत,

लूजान एरोल्स या स्पॅनिश महिलेने सोशल मीडियावर जवळपास एक महिन्यापूर्वी एक फोटो शेअर केला. तिच्या बागेत तिला हा दोन डोक्याचा आणि तीन डोळ्याचा अजब प्राणी दिसला. सुरूवातीला तिला हा सापच वाटला पण नंतर मात्र तिला याचे उत्तर कळाले, आता थोडी गंम्मत म्हणून तिने याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. नेटीझन्सना तरी या प्राण्याला ओळखता येते का ते पाहू असे तिने ठरवले. पण अनेकांना डोके खाजवूनही याचे उत्तर मिळेना. आता तुम्हालाही उत्सुकता असेच याचे नाव जाणून घ्यायची. त्यामुळे फारसे सस्पेन्स न ठेवता याचे उत्तर सांगून टाकतो! हा कोणी परग्रहावरचा प्राणी किंवा विचित्र साप नाही तर हा आहे सुरवंट. याच्या अंगावर असलेल्या अनोख्या ठिपक्यामुळे तो सापासारखा दिसतो.

Leave a Comment