एक छोटे घर खरेदी करायचे तर त्यासाठी लक्षावधी रूपये जमवावे लागतात. मात्र मोटरसायकल खरेदी करण्यासाठी लागणार्या पैशातच आख्या गावाची मालकी घेता येत असेल तर? विश्वास बसत नाही? मग हंगेरीला भेट द्यायला हवी. राजधानी बुडापेस्टपासून २०० किमी वर असलेले मेगयर हे गाव विक्रीसाठी काढले गेले आहे. हे गांव कांही साधेसुधे नाही तर ते ११ व्या शतकातले प्राचीन ऐतिहासिक गांव आहे. या गावची अर्थव्यवस्था कोलमडल्याने तेथील महापौर क्रिस्टीफ वेजर यांनी हे गांव विक्रीसाठी काढले आहे.
फक्त ५० हजारांत घ्या गावाची मालकी
या गावाची मालकी घेण्यासाठी ७०० युरो म्हणजे साधारण ५० हजार रूपये भरावे लागतील. या योजनेत अनेकांनी रस दाखविला असून १ हजार जणांनी आत्तापर्यंत चौकशी केली आहे तर ४०० जणांनी त्यासाठी बुकींग केले आहे. या गावात ७ गेस्ट हाऊसेस, चार रस्ते, १ बस स्टॉप, पोल्टी, ६ घोडे, २ म्हशी, १० एकर शेती आहे. गावासाठी पैसे मोजणार्या व्यक्तीला कायमस्वरूपी उपमहापौरपद दिले जाणार आहे. गावातील मालमत्ता भाड्याने देऊन त्यातून जे उत्पन्न येईल त्यातून गावाचा विकास केला जाणार आहे. पर्यटक त्यांच्या आवडीनुसार या गावातील गल्ल्यांची नांवे ठरवू शकणार आहेत. खेळाचे मैदानही त्यांच्या आवडीप्रमाणे तयार करू शकणार आहेत.