भविष्यातली घरे कशी असू शकतील याचे उदाहरण देणारे कमीत कमी जागेतले व एकाच खोलीतून चार वेगळ्या खोल्या तयार करणारे घर ब्रिटीश अर्कीटेक्ट जॉर्ज क्लार्क व डिझायनर विलीयम हार्डल यांनी तयार केले असून जगभरातून त्याचे कौतुक केले जात आहे. वाशिंग मशीनप्रमाणे गोल फिरणार्या या घरात एक खोलीत चार खोल्यांचा वापर करता येतो. या घराच्या भिंती एक इलेक्ट्रीक बटण दाबताच हॉल, किचन, बेडरूम मध्ये कन्व्हर्ट होतात. या घराचा आतला भाग स्विच दाबताच ३६० अंशात फिरतो व हव्या त्या खोलीत रूपांतरीत होतो.
भविष्यातले अद्भूत घर तयार
आतल्या भिंती फिरत असताना घरातील व्यक्ती दरवाजात उभ्या असतात व त्यामुळे या भिंती सहज उघडतात. या घरात चार माणसे राहू शकतात. यातील काचेचे डायनिंग टेबल हवे असेल तेव्हा बेडस, हॉलमधील टिव्ही मध्ये बदलतात. या घराच्या सर्व खोल्यात कपाटे आहेत व त्यातील सामान घराच्या भिंती वॉशिगमशीनमधील ड्रायरसारख्या फिरत असतानाही खाली पडत नाही. कारण हे सर्व सामान शक्तीशाली चुंबकांमुळे जागेवरच घट्ट राहते. अगदी स्वयंपाकघरातील भांडीही याच पद्धतीने चिकटलेली राहतात.
या घरासाठी लाकूड व अॅल्युमिनियमचा वापर केला गेला आहे त्यामुळे ते वजनाला खूपच हलके आहे. प्रत्येक खोलीसाठी वेगवेगळ्या रंगांचे एलईडी लाईट दिले गेले आहेत. त्यामुळे मंद अथवा स्वच्छ हवा तसा प्रकाश मिळतो. हे घर अॅटॅच्ड बाथरूमसह आहे मात्र ही बाथरूम घराच्या बाहेर आहे व ती फिरत नाही. भिंती फिरविण्यासाठी शक्तीशाली मोटर्सचा वापर केला गेला आहे.