न्यूयॉर्कमध्ये होणार उलट्या इंग्लीश यू अक्षराची महाप्रचंड इमारत


जगातील सर्वाधिक लांबीची इमारत न्यूयार्कमध्ये बांधली जाणार असून या इमारतीचा आकारही जगात कुठेच आढळणार नाही. इंग्रजी वर्णमालेतील यू हे अक्षर उलटे केल्यावर दिसेल म्हणजे थोडक्यात महाप्रचंड आर्कप्रमाणे दिसेल असे या इमारतीचे डिझाईन आहे. ओहयो स्टुडिओ फर्मने द बिग बेंड या नावाची ही इमारत बांधण्यासाठीचा प्रस्ताव सादर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या इमारतीची लांबी ४ हजार फूट असेल. ही इमारत उलट्या यूच्या आकाराची असल्याने ती जगातील सर्वात उंच इमारत नाही मात्र हा यू चा आकार सरळ केला तर जगातील बुर्ज खलिफा, न्यूयॉर्कच्या वर्ल्ड ट्रेड सेंटर व अन्य उंच इमारतींच्या दुप्पट होणार आहे. संपूर्ण काचेमध्ये उभारल्या जाणार्‍या या इमारतीत लिफ्ट बांधणे मोठे आव्हानात्मक काम आहे कारण लिफ्टही यू आकारातच बांधावी लागणार आहे. सेंट्रल पार्कमधील बिलेनियर रोमध्ये ही इमारत वन ५७ टॉवर व यावर्षी पूर्ण होणार्‍या १११ वेस्ट ५७ स्ट्रीट या इमारतींच्या मध्ये होणार आहे. या भागात शहरातल्या अनेक आलिशान इमारती आहेत.

Leave a Comment