‘आधार’मुळे कालबाहय़ होणार पॅन कार्ड


नवी दिल्ली – आधार कार्डचा वापर गेल्या दोन वर्षात अनेक सरकारी योजनांसाठी करण्यात येत आहे. २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सध्या आधारऐवजी पॅन कार्डचा वापर करण्यात येत आहे. नागरिकांची बायोमॅट्रिक आणि अन्य माहिती अधिक विस्तृत स्वरुपात आधार कार्डवर असल्याने प्राप्तिकर विभागाने पॅन ऐवजी आधार कार्डचा वापर करण्यास प्रारंभ केला आहे.

२०१२मध्ये प्रायोगिक पातळीवर आधार कार्डचा वापर करण्यास सुरूवात करण्यात आली होती. याचप्रमाणे पॅन कार्डचीही माहिती देण्यास सांगण्यात आले होते. आधार कार्डमध्ये हाताचे ठसे आणि आयरिस स्कॅन करण्यात आल्याने पॅन कार्डपेक्षा आधार कार्ड अधिक विश्वासार्ह असते. अनेक करदाते पॅन कार्डचा गैरवापर करत बनावट कार्ड तयार करत असल्याचे प्राप्तिकर विभाग आणि सरकारच्या निदर्शनात आले. भविष्यात सरकारी योजनांसाठी पॅन कार्डच्याऐवजी ‘आधार’चा वापर करण्यात येईल, असे वरिष्ठ सरकारी अधिका-याने म्हटले.

सध्या पॅन कार्ड बरखास्त करण्याचा सरकारचा विचार नाही. सध्या २५० दशलक्ष पॅनकार्ड वितरित करण्यात आली आहेत, त्यापैकी 40 दशलक्ष कार्डचा वापर वैयक्तिक प्राप्तिकर भरण्यासाठी केला जात आहे. आधार कार्डने अधिक व्यवहारात पारदर्शकता येत असल्याने भविष्यात अनेक योजनांसाठी ते वापरण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे.

Leave a Comment