टीव्हीएसची नवी अकुला ३१० स्पोर्ट्स बाइक


मुंबई – आपली नवी स्पोर्ट्स बाइक ‘अकुला ३१०’ लॉन्च करण्याची तयारी टीव्हीएस मोटर कंपनी करत आहे. या बाइकची झलक टीव्हीएस कंपनीने २०१६ मध्ये दिल्लीत झालेल्या ऑटो एक्सपोमध्ये दाखविली होती. तेव्हापासून बाइक प्रेमी या गाडीची आतूरतेने वाट पाहत आहेत. ‘अकुला ३१०’ बाइक जून २०१७ मध्ये लाँन्च करणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.

बीएमडब्ल्यूच्या जी ३१० आर शी मिळता-जुळता ‘अकुला ३१०’ या बाइकचा लूक असल्याचे पहायला मिळत आहे. एबीएस आणि वायकेबी सस्पेन्शन ‘अकुला ३१०’ या बाइकला कंपनी देण्याची शक्यता आहे. या बाइकची किंमत १.५ लाख ते १.८ लाख असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. टीव्हीएस कंपनीने आरटीआर३०० ला नवा लुक देत लाँन्च केले आहे, ही बाइक आपाचे आरटीआर३०० मॉडल आहे. कंपनीने या बाइकला अकुला नाव दिले आहे.

कार्बन फायबर पार्ट्सचा ‘अकुला ३१०’ ही बाइक बनविण्यासाठी वापर केला आहे, ज्यामुळे बाइकचे वजन कमी झाले आहे. ‘अकुला ३१०’ मध्ये ३१३ सीसीचा सिंगल सिलेंडर दिला आहे. ही बाइक ९५००आरपीएमवर ३३.४ बीएचपीची पॉवर देते आणि ७५०० आरपीएमवर २८ एनएम टार्क जनरेट करते. मायलेजचा विचार केला तर ही बाइक ३३ केएमपीएल एवढा मायलेज देईल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

Leave a Comment