टेलिनॉर देणार ८० पैशात १जीबी ४जी डेटा


मुंबई – ग्राहकांना आपल्याकडे रिलायन्स जिओने अल्पावधीतच आकर्षित केल्यानंतर त्याचा धसका इतर कंपन्यांनी घेतला आहे. देशातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी नवीन प्लॅन घेऊन येत आहेत. एअरटेल, व्होडाफोन, आयडिया, बीएसएनएलनंतर नार्वेच्या टेलिनॉर कंपनीने त्यांच्या भारतातील सर्कलमध्ये सर्वात स्वस्त डेटा प्लॅन आणला आहे.

टेलिनॉरने हा डेटा प्लॅन जिओला टक्कर देण्यासाठी आणि आपला ग्राहक कायम ठेवण्यासाठी आणला आहे. ४७ रुपयांच्या या रिचार्जवर ५६ जीबीचा ४जी डेटा मिळणार आहे. हा डेटा दररोज २जीबीनुसार एक महिन्यासाठी असणार आहे. तसे पाहता टेलिनॉर कंपनीचे फोर-जी नेटवर्क मर्यादित भागातच आहे.

फक्त मोजक्याच ग्राहकांसाठीच ४७ रुपयात ५६ GB डेटा हा प्लॅन आहे. ज्या मोबाईलवर कंपनीमार्फत हा मेसेज जाईल त्याला ह्या प्लॅनचा लाभ घेता येईल. काही ग्राहकांना टेलिनॉरमार्फत मेसेज आले आहेत. त्या मेसेजमध्ये १जीबी ४जी डेटा फक्त ८० पैशात असे लिहिण्यात आले आहे. मात्र यामध्ये फ्री कॉलिंगचा समावेश नाही.

1 thought on “टेलिनॉर देणार ८० पैशात १जीबी ४जी डेटा”

  1. JOB job { CHAMPCASH }
    घर बैठे आप Android फोन से बीना पैसे लगाऐ 50000₹ तक कमाऐ
    जानकारी के लिऐ Accept लिखकर 9860148133 पर whatsapp करे

Leave a Comment