नोकियाचा फिचर फोन लाँच


नवी दिल्ली – आपला नवा स्मार्टफोन नोकिया मोबाईल कंपनीने भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केला असून नोकिया ६, नोकिया ५ आणि नोकिया ३३१० नंतर आपला नोकिया १५० हा नवा स्मार्टफोन कंपनीने लाँच केला आहे. कंपनीचा हा नवा फिचर फोन असून हा फोन डिसेंबर २०१६ मध्ये लाँच केला होता. भारतीय बाजारात या फोनची किंमत १९५० रुपये आहे. १९५० रुपयांमध्ये मिळणारा हा स्मार्टफोन अॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

भलेही नोकिया १५० हा फिचर फोन असला तरीही याचे फिचर्स स्मार्टफोनपेक्षा कमी नाही आहेत. कि-पॅड असलेल्या या हँडसेटमध्ये २.४ इंचाची स्क्रिन देण्यात आली आहे. याचे रिझॉल्युशन २४०X३२० पिक्सल आहे. आपल्या सेगमेंटमध्ये हा एक चांगला कॅमेरा असलेला फोन आहे. या फोनमध्ये व्हिजीए रिझॉल्युशनचा कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश देण्यात आला आहे.

नोकिया १५० फोनमध्ये १०२० mAh ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे, जी २२ तास टॉक टाइम आणि ३१ दिवस (एका सिमसाठी) स्टँडबाय टाइम देते. या फोनमध्ये ड्युल सिमकार्ड असलेला फोनही उपलब्ध आहे. या फोनची इंटरनल मेमरी ३२जीबी देण्यात आली आहे. तसेच मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने मेमरी वाढविता येऊ शकते. नोकिया १५० मध्ये खुप चांगली कनेक्टिव्हीटी फिचर्स देण्यात आले आहेत. मायक्रो युएसबी, ३.५ mm एव्ही कनेक्टर, ब्ल्युटूथ, एफएम रेडिओ आणि एमपी३ प्लेयर देण्यात आले आहेत.

Leave a Comment