अहमदाबाद – बाजारात अमुलच्या डेअरी उत्पादनांना प्रचंड मागणी असून लवकरच अमुल फ्रोझन स्नॅक्स मार्केटमध्येही उडी घेत असून ७ ते ८ प्रकारच्या अमुल उत्पादनांचा यामध्ये समावेश असणार आहे.
आता समोसा अन् पॅटीसही विकणार ‘अमुल’
ही उत्पादने येत्या दोन आठवड्यांमध्ये बाजारात दाखल होणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. पनीर व चीज पराठा, समोसा, पॅटीस अशा उत्पादनांचा यात समावेश असणार आहे. अमुल उत्पादनांना मिळणारी वाढती पसंती लक्षात घेता इतर उत्पादनांकडेही वळण्याचा निर्णय कंपनीने घेतला असल्याची माहिती गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोधी यांनी दिली. अमुल कंपनीच्या विस्तारासाठी येत्या दोन वर्षात २००० कोटी रुपये गुंतवण्यात येणार आहेत.