हर्बल टीच्या अतिरेकाने जडू शकतात अनेक व्याधी


अलिकडे हर्बल टीकडे जिम करणारे शिवाय डायटिंग करणारे, तसेच ज्यांनी चहा सोडला अशा व्यक्ती वळलेल्या आहेत. पण वाटते तेवढी हर्बल टी सुरक्षित नाही. हर्बल टीचा अतिरेक हा तुमच्या आरोग्याला घातक ठरू शकतो. हर्बल टी दिवसांतून एक दोनदा घेतल्याने त्याचा शरीरावर परिणाम होत नाही. पण जर दिवसभरात आपण पाच कपांपेक्षा जास्त ‘ग्रीन टी’चे सेवन करत असाल तर ते मात्र तुमच्या आरोग्यास धोकादायक ठरू शकते.

अनेक व्याधी हर्बल टीच्या अतिसेवनाने होऊ शकतात. यात तीव्र डोकेदुखी, घाबरल्यासारखे होणे, निद्रानाशाची समस्या, उलटी, डायरिया, चिडचिडेपणा, हृदयाचे ठोके जलदगतीने पडणे, हातापायात कंप, हार्ट बर्न, चक्कर येणे, कानांमध्ये आवाज येणे आदी लक्षण जाणवतात.

हर्बल टी सोबतच ग्रीन टी मध्ये घातक ठरू शकते. ‘ग्रीन टी’मधील टेनन नामक रसायनामुळे पोटातील अँसिडची मात्रा वाढते. टेननंमुळे बद्धकोष्ठता, पोटदुखी, मळमळ संभवते. म्हणूनच जपान आणि चीनमध्ये जेवण झाल्यानंतर अथवा जेवणाच्या मध्ये ‘ग्रीन टी’ घेतला जातो. पेप्टक अल्सरची समस्या असल्यास तुम्ही ‘ग्रीन टी’ घेण योग्य नाही. ‘ग्रीन टी’मधील रसायने गर्भावस्थेत घातक ठरू शकतात. त्याचप्रमाणे स्तनपान देणार्‍या महिलांनाही ‘ग्रीन टी’चा दुष्परिणाम संभवतो. दोन कप ‘ग्रीन टी’मध्ये २०० ग्रॅम कॅफन असते. म्हणूनच या महिलांनी दिवसातून दोन कपापेक्षा अधिक ‘ग्रीन टी’ घेऊ नये. यामुळे गर्भपाताचा धोका संभवतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही