शाहरूख, गौरी खानसह जुहीला ईडीची कारणे द्या नोटीस


मुंबई : परकीय चलन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने(ईडी) इंडियन प्रीमिअर लीगमधील(आयपीएल) कोलकाता नाइट रायडर्स संघाचे संघमालक अभिनेता शाहरूख खान, त्याची पत्नी गौरी खान आणि अभिनेत्री जुही चावला यांना ‘कारणे द्या’ नोटीस बजावली आहे. आयपीएलच्या दहाव्या पर्वाला ५ एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. कोलकाता नाइट रायडर्स संघाला या पार्श्वभूमीवर ऐन वेळी बसलेला हा धक्का समजला जात आहे. ईडीच्या नोटिसीमुळे संघासमोर मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शेकडो कोटी रुपयांच्या य्व्यवहारात परकीय चलन कायद्याचे उल्लंघन झाल्याचा संशय ‘ईडी’ला आहे.

Leave a Comment